आपण दसरा का साजरा करतो ?

आज दसरा म्हणजे विजयादशमी! नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस! दुर्गा विसर्जन आणि दृष्ट रावणाच्या वधाचा दिवस! प्रभू रामचंद्रानी आजच्या दिवशी दशमीला लंकेत जाऊन रावणाचा वध केल्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले.

दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, याचे कारण असे आहे की रावणाचा वध म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय होता, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. त्याच्या दृष्कृत्यांमुळे आणि अहंकारामुळे त्याचा विनाश झाला.. म्हणून आपण आपल्यातील अहंकार आणि दुर्गुणांचा वध करावा आणि आपल्यातील राम जागा करावा असा या सणाचा उद्देश आहे. या दिवसी लोक घरातील अवजारांची पूजा करतात.

तसेच या दिवशी सरस्वती देवीचं देखील पूजन केल जात.