बीड तालुक्यातील तिप्पटवाडी शिवारात शेळ्या-मेंढयामध्ये साथीच्या रोगाचे थैमान! शेळीपालण व्यवसायावर वाईट परिणाम.


सविस्तर वृत! 

मागच्या एक ते दीड महिन्यांपासून बीड तालुका परिसरातील शेळ्यामध्ये साथीच्या रोगाच प्रमाण खूप वाढलं आहे. या रोगामध्ये शेळीला खूप तीव्र स्वरूपाचा ताप येतो आणि 2 ते 3 दिवसात शेळीचा मृत्यू होत आहे. यामुळे शेतकरी व शेळीपालण व्यावसायिक हतबल झाले आहेत. वैद्यकीय उपचार करूनसुद्धा त्याचा काही उपयोग होत नसल्याच दिसून येत आहे. त्यामुळे तोंडचा घास पळवल्यासारखी स्थिति या व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. 
बीड तालुक्यातील तिप्पटवाडी या गावात अक्षरश: या रोगाने धुमाकूळ घातला आहे, लाखों रूपयाचं नुकसान या गावातील शेतकऱ्यांना सहन कराव लागत आहे. 

या रोगाची काही लक्षणे:
शेळीला किंवा मेंढीला तीव्र ताप येणे. 
काहीही न खाणे. 
अशक्तपणा येणे, हालचाल न करणे.

वरीलपैकी कुठलीही लक्षणे आढळल्यास तात्काळ आपण पशुवैद्यकाशी संपर्क करावा.

कशी काळजी घ्यावी?

शक्य होईल तेवढं शेळयांना राहण्यासाठी कोरडा निवारा कर.
एखाद्या शेळीमध्ये आजाराची लक्षणे दिसत असतील तर त्या शेळीला उपचार होईपर्यंत वेगळी व्यवस्था करा.
💕💕