सगळं पाण्यात...!
"सोन्यासारख पीक
हातातून गेलं.
कष्टाच आमच्या माती मोल झालं..!
एक्या साली दुष्काळ
एक्या साली गारपीट
निसर्गाने केला घात..
वावरात मात्र कापसाची पावसानं
झाली वात...!
गेली सोयाबीन वाहून
भिजली रानात बाजरी..
याला कारण तूच आहेस
तू लावतोस दररोज हेजेरी...!
माईच्या आमच्या भेगाळलेल्या
टाचात जातोय र चिखल...
घालते दररोज धान्य वाळत
वाट पाहिते कधी ते सुकल...!
अरे पावसा तुझ्या या वागण्याने
आमच्या काळजाला पडली भेगळ..
थोडं तरी मनाला लाज
थांबव आमच्या डोळ्यातील ओघळ..!
: तिपटे अशोक

0 टिप्पण्या