उसतोड कामगारांच्या व्यथा मांडणारी एक खास कविता !


शेतातील कामे आवरले ले की काही लोक आता उसतोडणीला जातात उरावर सावकराच कर्ज असत मुलगी लग्नाला आलेली असते आणि मुलगाही शिकत असतो मग मुकादमाकडून लाखभर उचल घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीला गाव सोडून पर देशावर राहावं लागतं मागे मुला बाळांची सोय नसते, मग त्या मुलाला शाळेतून काढून त्याला सोबत न्यावं लागतं...!

फड 

कर्जापाई शोधावा लागतो 

उसाचा फड,

यंदा तरी  कर्ज फिटेल हीच त्याला ओढ...!


कोयता आणि बाप उसाच्या फडासोबत

झुंजत होते,

कधीतरी दिवस चांगले येतील या आशेने

आयुष्य जगत होते...!


माय माझी बापाला आधार देत होती

डोळ्यातून आलेले अश्रू पुसत होती,

चवीने मात्र ऊस गोड होता 

खाताने मात्र कडू लागत होता...!


घश्याखाली घास उतरत नव्हता

कर्ज फिटले असा भास होत होता,

लेकराला माझ्या झोपायला कुठली गादी

आणि कुठला खाट,

त्याच्या नशिबी मात्र उसाच पाचाट...!


गरिबी नशिबी आली की

कठीण परिस्थितीचा चढावा लागतो घाट,

कशाची वेळ आणि कशाचा काळ.

नशिबी मात्र कधी दुपार तर कधी पहाट...!


बाप कसाही असला तरी माईन माझ्या

बापासाठी पूजलं वडाला,

बापाने मात्र फेऱ्या मारल्या त्या उसाच्या अन

तमाश्याच्या फडाला...!


अरे बापा दे सोडून ते व्यसन

आणि दे सोडून तो फड,

बघ एकदा त्या आईकडं आणि

माझ्याकडं...!

तू फक्त लढ आणि फक्त लढ..!


तिपटे अशोक