ऑनलाइन अभ्यास आणि PUBG मुळे भरकटलेला विद्यार्थी...!
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन पडले आणि शाळा बंद झाल्या त्यामुळे विद्यार्थ्र्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले पण मोबाईलवर मुले अभ्यास बाजूला ठेऊन पबजी गेम खेळू लागले आणि त्यामुळे त्यांचं नुकसान आणि अभ्यासावर परिणाम झाला...! याच विषयाला अनुसरून अशोक तिपटे यांनी केलेली ही एक छोटीशी कविता!
झालं माझं ऑनलाइन
शिक्षण सुरू,
पण, मोबाईलला मात्र
पैसे कुठून भरू...!
इकडून तिकडून
घेतला मोबाईल,
त्यात नेटवर्क असायचं फोर जी
झाला त्याचा फायदा मला
मी खेळायचो पब-जी...!
अभ्यास राहायचा बाजूला
पब-जी मी खेळायचो..
तास न तास मी मोबाईल
घेऊनच बसायचो...!
बाबांना वाटतं मी करतोय अभ्यास,
पण मला फक्त पब-जी चा ध्यास..!
अभ्यास मला काही करू वाटेना,
पब-जी खेळल्याशिवाय
मला काही करमेना...!
खेळून खेळून
झाली सवय मला पब-जी ची,
वाट लागली माझ्या पूर्ण वर्षाची...!
तिपटे अशोक

0 टिप्पण्या