दसरा मेळावा 2020...!
राजकीय लोक सध्या म्हणजे आज दसरा मेळावा घेतात मग त्या मेळाव्यात कोण असत तर असतो आमचा शेतकरी ज्याच घर पाण्यात पाहून गेलं,ज्याची सोयाबीन,कापूस,आणि इतर पीक सगळं पावसामुळं वाया गेल मग जो शेतकरी देशाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या नुकसान भरपाईचा मेळावा का भरत नाही जी लढाई शेतकरी हरला अस वाटत असेल पण मी म्हणेल की नक्कीच नाही यात कुठेतरी आपलं प्रशासन कमी पडत आहे.
मग आमच्या शेतकरी बांधवाला नाही का सण त्याला नाही का गोड धोड खावं वाटत पण त्याच कुठलं एवढं मोठं नशीब त्याच्या नशिबात तर कधीही संघर्ष महागा मोलाचं बी खरेदी करून जमिनीत टाकावं लागत मग हा जुगाराचा खेळ जमेल का कुणाला खेळायला तर नाही.
त्याच्या पण मुलांना वाटत की आजच्या दिवशी नवे कपडे घालावे पण नाईलाज असतो त्याच्याकडे पैसाच नसतो जो होता तो मातीत घातला तो ही सावकाराकडून कर्ज घेतलेला त्याच मीटर चालूच असत सर्व त्याच्याच भोवती का त्याचच घर गळंत, त्याचंच पीक वाया जात,त्याच्याच शेळ्या जनावरे मारतात का का या यातना त्याच्याच भोवती काही पण झालं की त्याने फक्त रडायचं आणि डोळे पुसायचे त्याच्या बायकोने त्याला आधार द्यायचा या पलीकडे काय असत आमच्या जीवनात .
बायकोच्या गळ्यात चार काळे मणी ,रोजच रडतो माझा धनी
ही अवहेलना कुठं तरी थांबली पाहिजे शेतकऱ्याला प्रशासनाने मदत केली पाहीजे काही नवीन योजना दिल्या पाहिजेत.
तुम्ही नक्की तुमचा मेळावा घ्या पण त्या मेळाव्यात आमच्या तक्रारी मांडा कारण मतदानाच्या वेळेला तुम्ही त्याच कष्टकरी लोकांच्या जीवावर निवडून आला असता मग तुम्ही त्यांना मदत का करत नाही, का शेतकरी आत्महत्या करतो, का तो कर्जबाजारी होतो त्यावर काही उपाययोजना नाही आपण राबवू शकत का सवकरकडून कर्ज न घेता त्याला एखाद्या कमी टक्केवारीने जर लोन भेटले तर त्याला आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही.
सरकार मायबाप हे कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकरी जगला पाहिजे..
लिखाण:-तिपटे अशोक
💕💕

0 टिप्पण्या